Monday, March 12, 2012

फक्त I Love You म्हणायचं बाकी होत रे

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वाळूत बोटे रूतलेली
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
एक क्षितिजरेष दिसायची

मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या
घराची वीट मात्र ढासळली नाही...
फक्त I Love You म्हणायचं बाकी होत रे

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वाळूत बोटे रूतलेली
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
एक क्षितिजरेष दिसायची

मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या
घराची वीट मात्र ढासळली नाही...

Sunday, February 5, 2012

तुझी आठवण.....

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
... डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू,
खुप गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.
खरच.....
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही....

Saturday, February 4, 2012

एक वेडी मैत्रीण होती माझी

एक वेडी मैत्रीण होती माझी ,
बोलायला लागली कि आपलंसं करून टाकणार ,
तिचं मन म्हणजे नितळ पाण्याचा झरा ,
स्वतःचा असा रंगच नाही त्याला ,


जो रंग मिसळला त्याच रंगात न्हाऊन निघणारं ,
नकळतपणे त्याच्याशीच एकरूप होणारं ,
तिला एक दिवस विचारलं,
यातले चांगले मित्र कोण कसं ग तुला ओळखता येतं,


तर म्हणे ,
हे रंग तर प्रवाहाबरोबर वाहून जातात ,
त्यांना माझ्यापासून वेगळं करता येतं ,
खरे मित्र तर ते आहेत, जे माझ्याच सारखे असतात ,
माझ्यात एवढं मिसळून जातात कि ,
त्यांना माझ्याहून वेगळं सांगता येणार नाही ,
जसा पाण्याच्या दोन थेंबामधला फरकच करता येत नाही ......

Tuesday, January 31, 2012

तिच्यावर रागावणं तिच्यावर रूसणं मला कधी जमलचं नाही

तिच्यावर रागावणं
तिच्यावर रूसणं
मला कधी जमलचं नाही
कारण
तिच्याशिवाय माझं मन दुसऱ्या कोणात रमलचं नाही!

ती येणार असताना
मध्येच पावसाचं येणं कळत नाही,
पण तिच्या प्रेमाएवढा आनंद मला पावसातही मिळत नाही!

माझी कविता वाचताना तिचे डोळे नेहमी गळतात
तिच्या आयुष्याचे धागे म्हणे माझ्या आयुष्याशी जुळतात!

--
--
तू माझ्या प्रत्येक गोष्टीला
नाही म्हणशील,
नाही नाही म्हणताना
तू एकदा तरी प्रेमात पडशील" 
 ........


♥      ♥    ♥   ♥ ♥ ♥ ♥    
♥   ♥   ♥    ♥        ♥        
♥      ♥    ♥        ♥       

Wednesday, January 25, 2012

तू बरोबर असतोस तेव्हा


तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
... ... फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,

फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,
नाहीतर मनात सगळं दुखं, दाबून ठेवावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,

नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस पाहावस वाटत...

Nits.....!
तू बरोबर असतोस तेव्हा,
जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...!