Sunday, February 5, 2012

तुझी आठवण.....

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
... डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू,
खुप गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.
खरच.....
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही....

Saturday, February 4, 2012

एक वेडी मैत्रीण होती माझी

एक वेडी मैत्रीण होती माझी ,
बोलायला लागली कि आपलंसं करून टाकणार ,
तिचं मन म्हणजे नितळ पाण्याचा झरा ,
स्वतःचा असा रंगच नाही त्याला ,


जो रंग मिसळला त्याच रंगात न्हाऊन निघणारं ,
नकळतपणे त्याच्याशीच एकरूप होणारं ,
तिला एक दिवस विचारलं,
यातले चांगले मित्र कोण कसं ग तुला ओळखता येतं,


तर म्हणे ,
हे रंग तर प्रवाहाबरोबर वाहून जातात ,
त्यांना माझ्यापासून वेगळं करता येतं ,
खरे मित्र तर ते आहेत, जे माझ्याच सारखे असतात ,
माझ्यात एवढं मिसळून जातात कि ,
त्यांना माझ्याहून वेगळं सांगता येणार नाही ,
जसा पाण्याच्या दोन थेंबामधला फरकच करता येत नाही ......