Sunday, June 8, 2014

आयुष्यातले सुखाचे क्षण...!

GOLDEN DAYZ

The end of golden dayz..
And d start of golden memories...��

खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...

तेरावा Option लागला होता Amrutvahini..
F.E ला Division होती माझी 'A'...
मला नाही ती जास्त आवडायची...
कारण Toppersशी माझी कधी मैफीलच नाही जमायची...

खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...

S.Eला Civil Dept.ला झाली Entry..
✏��������
पण Dept. बरोबर माझी Strength
काही पक्की होत नव्हती...
कारण जवळीक होत होतं
Mechanical च्या मित्रांशी...
F.Eला दोन Back
राहिल्यामूळे करता आली नाही Branch Change...
आणि मग Civil वाटायला लागली Out of Range...


खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...

एक Drop नंतर झाली T.E Civil ला Re-Entry...
आवडायला लागली एक Beauty...
आणि थांबलीच नाही मग कधी माझी Poetry...����
Detention List मध्ये Top करणारा मी..
करायला लागलो सगळे Lecture...��
आणि पाहता पाहता....तिला..

कळालच नाही कधी संपलं Third year..����

खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...

Final year मध्ये केली खूपच मजा...
मित्रांच्या मस्तीतून घेतलीच नाही कधी रजा..
AmrutCup जिँकल्यावरची Konkan Trip...
आणि दर गुरुवारी केलेला कारखाण्यावरचा बाजार तर
मी कधीच विसरणार नाही..
B.E Civil 2009-10इतकी धमाल दुसरी कुठली Batch
करणार नाही...
आपल्या 'दमलेल्या बाबाची कहाणी' शिवाय
दुसऱ्या कुठल्याच Performanceला Gathering मध्ये
Standing Ovation मिळालं नाही...
असेच आयुष्यात आपण सगळे जाणार जिँकत...����
एकमेकास सहाय्य करुन सगळे धरणार सुपंथ...
����������

खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...

- नितीश मुंगसे

Monday, March 12, 2012

फक्त I Love You म्हणायचं बाकी होत रे

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वाळूत बोटे रूतलेली
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
एक क्षितिजरेष दिसायची

मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या
घराची वीट मात्र ढासळली नाही...
फक्त I Love You म्हणायचं बाकी होत रे

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वाळूत बोटे रूतलेली
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
एक क्षितिजरेष दिसायची

मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या
घराची वीट मात्र ढासळली नाही...

Sunday, February 5, 2012

तुझी आठवण.....

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
... डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू,
खुप गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.
खरच.....
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही....

Saturday, February 4, 2012

एक वेडी मैत्रीण होती माझी

एक वेडी मैत्रीण होती माझी ,
बोलायला लागली कि आपलंसं करून टाकणार ,
तिचं मन म्हणजे नितळ पाण्याचा झरा ,
स्वतःचा असा रंगच नाही त्याला ,


जो रंग मिसळला त्याच रंगात न्हाऊन निघणारं ,
नकळतपणे त्याच्याशीच एकरूप होणारं ,
तिला एक दिवस विचारलं,
यातले चांगले मित्र कोण कसं ग तुला ओळखता येतं,


तर म्हणे ,
हे रंग तर प्रवाहाबरोबर वाहून जातात ,
त्यांना माझ्यापासून वेगळं करता येतं ,
खरे मित्र तर ते आहेत, जे माझ्याच सारखे असतात ,
माझ्यात एवढं मिसळून जातात कि ,
त्यांना माझ्याहून वेगळं सांगता येणार नाही ,
जसा पाण्याच्या दोन थेंबामधला फरकच करता येत नाही ......

Tuesday, January 31, 2012

तिच्यावर रागावणं तिच्यावर रूसणं मला कधी जमलचं नाही

तिच्यावर रागावणं
तिच्यावर रूसणं
मला कधी जमलचं नाही
कारण
तिच्याशिवाय माझं मन दुसऱ्या कोणात रमलचं नाही!

ती येणार असताना
मध्येच पावसाचं येणं कळत नाही,
पण तिच्या प्रेमाएवढा आनंद मला पावसातही मिळत नाही!

माझी कविता वाचताना तिचे डोळे नेहमी गळतात
तिच्या आयुष्याचे धागे म्हणे माझ्या आयुष्याशी जुळतात!

--
--
तू माझ्या प्रत्येक गोष्टीला
नाही म्हणशील,
नाही नाही म्हणताना
तू एकदा तरी प्रेमात पडशील" 
 ........


♥      ♥    ♥   ♥ ♥ ♥ ♥    
♥   ♥   ♥    ♥        ♥        
♥      ♥    ♥        ♥       

Wednesday, January 25, 2012

तू बरोबर असतोस तेव्हा


तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
... ... फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,

फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,
नाहीतर मनात सगळं दुखं, दाबून ठेवावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,

नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस पाहावस वाटत...

Nits.....!
तू बरोबर असतोस तेव्हा,
जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...!

Saturday, January 30, 2010

Hi frenz
join free mobile sms group
get free sms on your mobile
just type sms
"JOIN UR-HEART"
& send it to
09870807070
its absolutly free....